नवी मुंबई महानगरपालिकेचा २७ वा वर्धापनदिन साजरा !

नवी मुंबई – नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण सर्वजण कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन महापौर जयवंत सुतार यांनी १ जानेवारी या दिवशी वाशी येथे केले. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या २७ व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त ते बोलत होते. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन्. या वेळी म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि सर्व नागरिक यांच्या सहयोगाने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये आपले देशातले मानांकन आणखी उंचावेल. (केवळ दर्जेदार सुविधांनी जनता सुखी होत नाही. असे असते तर आज अमेरिका सर्वात सुखी राष्ट्र झाले असते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF