संभाजीनगर येथील चि. निविका तिवारी (वय ३ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. निविका तिवारी ही एक आहे !

चि. निविकाचा सत्कार करतांना सौ. संजीवनी कोळेश्‍वर

संभाजीनगर, ४ जानेवारी (वार्ता.) – येथील सनातनचे साधक श्री. निखिल तिवारी यांची मुलगी चि. निविका तिवारी (वय ३ वर्षे) ही महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालिका असून तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी आहे, ही आनंदवार्ता येथील सनातनच्या साधिका कु. चैताली डुबे यांनी दिली. २ जानेवारी या दिवशी श्री. निखिल तिवारी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात ही आनंददायी घोषणा करण्यात आली. या वेळी सनातनच्या साधिका ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संजीवनी कोळेश्‍वर यांनी चि. निविकाचा भेटवस्तू आणि खाऊ देऊन सत्कार केला. या वेळी निविकाच्या कुटुंबियांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

१. आता दैवी बालिकेची आई म्हणून घडायचे आहे ! – सौ. निधी निखिल तिवारी (चि. निविकाची आई)

चि. निविका महर्लोकातून आलेली आहे, हे घोषित होताच मला पुष्कळ आनंद झाला. इतके दिवस आई म्हणून मी तिचा सांभाळ करत होते; परंतु आता दैवी बालिकेची आई म्हणून मला घडायचे आहे, याची जाणीव झाली.

२ दिवसांपूर्वी माझ्या मनात ‘आपण नोकरी करावी’, असे विचार येत होते. याविषयी मी यजमानांशीही बोलले होते. ३ वर्षांपूर्वी चि. निविका गर्भात असतांना मी नोकरी सोडली होती. नोकरी करावी कि नाही, याविषयी मी २ दिवसांपूर्वी संभ्रमात होते. त्या वेळी मी सहजच निविकाला म्हटले, ‘‘मैं जॉब करने जाऊ क्या ?’’ तेव्हा तिने संपूर्ण घराकडे हात फिरवत सांगितले, ‘‘यही तो है, तुम्हारा ऑफिस ।’’ मी म्हटले, ‘‘मेरा बॉस कौन है ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘मैं हू ना, तुम्हारा बॉस ।’’ तिच्या या उत्तराने माझा संभ्रम दूर झाला. आज तिच्या आध्यात्मिक प्रगतीची घोषणा ऐकून तिचे उत्तर आठवले. अशा दैवी जिवाची सेवा घडावी, यासाठी देवानेच मला नोकरीपासून परावृत्त केले. देवाच्या चरणी मी कृतज्ञ आहे.

२. चि. निविका महर्लोकातून आल्याचे ऐकताच गुरुमाऊलीची आमच्यावर कृपा आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

– श्री. सत्यनारायण तिवारी (चि. निविकाचे आजोबा)

३. आज सोनियाचा दिवस उगवला, हा दिवस कधीच विसरणार नाही ! – सौ. सविता तिवारी, संभाजीनगर (चि. निविकाची आजी (वडिलांची आई))

‘चि. निविकाच्या प्रगतीविषयी कळताच आज सोनियाचा दिवस उगवला, असेच वाटत आहे. हा दिवस मी कधीच विसरणार नाही. तिची गुणवैशिष्ट्ये टंकलिखित करतांना मला पुष्कळ आनंद होत होता. त्या आनंदाचे कारण आज उलगडले. आज साधक घरी आले, त्या वेळी त्यांना पाहून ‘काहीतरी आनंदवार्ता मिळणार’, असे वाटले होते. काही वेळातच साधिकेने चि. निविकाच्या प्रगतीची घोषणा केली. आम्ही सर्व कुटुंबीय परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.’

४. गेल्या १ मासापासून चि. निविकाला भेटावेसे वाटत होते ! – सौ. रासेश्‍वरी लक्रस (पूर्वाश्रमीची कु. भारती तिवारी, निविकाची आत्या)

‘चि. निविकाच्या प्रगतीची आनंदवार्ता कळताच माझ्या अंगावर रोमांच आले. मला गत १ मासापासून तिला भेटावेसे वाटत होते. मी २ दिवसांपूर्वीच संभाजीनगर येथे आले आणि आज ही आनंदवार्ता ऐकायला मिळाली. तिची आध्यात्मिक पातळी घोषित होतांना मला देवाने येथे ठेवले, त्याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

५. चि. निविका महर्लोकातील आहे, हे कळल्यावर पुष्कळ आनंद झाला !

चि. निविका ही महर्लोकातील आहे, हे कळल्यावर अतिशय आनंद झाला. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व देवतांच्या चरणी कृतज्ञता ! – सौ. आशा आणि श्री. अरविंद गंगेले (चि. निविकाचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील))

६. चि. निविकाच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आमच्या कुटुंबावर कृपा केली ! – डॉ. (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (निविकाची आत्या)

‘चि. निविकाचा जन्म या कुटुंबात झाला. महार्लोकातील जिवाला देवाने आमच्या घरात पाठविले. तिच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आमच्या कुटुंबावर कृपा केली आहे. या कृपेविषयी माझ्याकडे कृतज्ञतेला शब्द नाहीत. हे केवळ त्यांच्याच कृपेने झाले.

आज मला अचानक घरी संपर्क करावासा वाटला. संपर्क केल्यावर बाबा म्हणाले, ‘घरी साधक आले आहेत.’ तेव्हा मला साधकांच्या रूपात परात्पर गुरु डॉ. आठवले घरी आले आहेत, असेच सूक्ष्मातून दिसले. त्यानंतर १ घंट्याने मला कळले की, चि. निविकाची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली आहे. परापर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आज माझ्या आनंदाच्या सागरात भर पडली, त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’


Multi Language |Offline reading | PDF