बनारस हिंदु विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने तंबू पाठवला !

जोपर्यंत रामलला तंबूत आहेत, तोपर्यंत तुम्हीही तंबूतच रहा ! – विद्यार्थी

राममंदिराचा प्रश्‍न भिजत ठेवणार्‍या भाजपला यापुढे हिंदूंच्या रोषाला असेच सामोरे जावे लागेल ! यातून बोध घेऊन राममंदिर उभारण्यासाठी अध्यादेश काढण्याची बुद्धी भाजप सरकारला होईल, तो सुदिन !

वाराणसी – ‘प्रभु रामचंद्राचे नाव घेऊन सत्तेवर आलेले प्रशस्त बंगल्यामध्ये रहात आहेत आणि रामलला मात्र तंबूत ! हे चित्र संतापजनक आहे. मोदीजी, जोपर्यंत रामलला तंबूत आहेत, तोपर्यंत तुम्हीही बंगल्यात नाही, तर तंबूत रहा’, असे सांगत बनारस हिंदू विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘स्पीड पोस्टा’ने तंबू पाठवला. तसेच ‘यापुढे भाजपच्या प्रत्येक खासदार आणि आमदार यांना आम्ही तंबू पाठवणार’, असेही या विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या एका गटाने ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे’ अशा घोषणा देत विद्यापिठातील टपाल कार्यालयात जाऊन ‘स्पीड पोस्ट’ पाठवले. पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीत ‘न्यायालयाच्या निर्णयानंतरच राममंदिराविषयी सरकार अध्यादेश काढील’, असे म्हटले होते. त्यावर संतप्त होऊन विद्यार्थ्यांनी वरील कृती केली.

अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी १० जानेवारीला नव्या खंडपिठासमोर सुनावणी होणार

नवी देहली – अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाची ४ जानेवारीला होणारी सुनावणी १० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी नव्या खंडपिठापुढे होणार आहे. अवघ्या १ मिनिटात न्यायालयाने हा निर्णय दिला. सध्या ज्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे, त्यातील एक न्यायाधीश निवृत्त झाल्याने नव्या पिठाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. यामुळेच या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्या दिवशी या ३ सदस्यीय न्यायाधिशांच्या नव्या पिठाची नियुक्ती होईल. या न्यायाधिशांची नावे ६ किंवा ७ जानेवारीला घोषित केेली जातील.

राममंदिराचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुकीत अन्य प्रश्‍न असतील ! – राहुल गांधी

‘राममंदिरावर काँग्रेसचे मत काय आहे’, हे राहुल गांधी स्पष्टपणे हिंदूंना का सांगत नाहीत ? ते केवळ मंदिरांत जाण्याचे ढोंग का करत आहेत ?

नवी देहली – राममंदिराचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये नोकरी, बेरोजगारी, शेतकरी आदी सूत्रे असतील, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF