राज्यात ५० महसुली मंडलातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ घोषित !

दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती निवारण यासाठी राजा आणि प्रजा या दोघांनीही साधना करून सत्त्वप्रधान होणे आवश्यक आहे !

मुंबई – राज्यातील ५० पैशांपेक्षा अल्प आणेवारी आणि अल्प पर्जन्यमान असलेल्या ५० महसुली मंडलातील ९३१ गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा निर्णय ३ जानेवारी या दिवशी राज्य सरकारने घेतला. केंद्र सरकारन राज्यातील १५१ तालुक्यांत यापूर्वीच दुष्काळ घोषित केला होता; मात्र केंद्राच्या निकषात न बसणार्‍या आणि वास्तवात दुष्काळी परिस्थिती असलेल्या २६८ महसुली मंडळात राज्य सरकारने यापूर्वीच दुष्काळ घोषित केला होता. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेमध्ये १०० दिवसांऐवजी १५० दिवस मजुरी देण्यास केंद्र शासनाने संमती दिली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार ३५० दिवस मजुरी देण्याचा विचार करीत आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. दुष्काळी गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहेत, तसेच घेतलेले परीक्षा शुल्क जानेवारी अखेपर्यंत परत करण्यास संबंधित विद्यापिठांना सूचना केल्या आहेत. चारा उत्पादन वाढवावे, यासाठी गोरक्षण संस्थांनाही नाममात्र दरात गाळपेर भूमी देण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF