टक्केवारी मिळाली नाही; म्हणून काँग्रेसने राफेल खरेदी केले नाही ! – संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन

नवी देहली – टक्केवारी (कमिशन) मिळाली नाही; म्हणून काँग्रेसने राफेल विमानांची खरेदी केली नाही, असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेमध्ये राफेलच्या सूत्रावरून बोलतांना केला. तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य लोकांकडून ‘राफेलच्या निर्मितीचे कंत्राट ‘हिंदुस्थान एरोनॅटिक्स लिमिटेड’ला (‘एच्एएल’्ला) का दिले नाही ? अनिल अंबानी यांच्या आस्थपनाला कंत्राट का दिले ? आदी प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. यावर सीतारमन यांनी उत्तर देतांना म्हटले की, ‘‘व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर’चे कंत्राट तुम्ही ‘एच्एएल्’ला का दिले नाही ? ‘एच्एएल्’कडून तुम्हाला काही मिळणार नाही हे माहीत होते. ते ‘ऑगस्टा वेस्टलँड’कडून मिळाले; म्हणून तुम्ही ‘एच्एएल्’ऐवजी ‘ऑगस्टा वेस्टलँड’ची निवड केली.


Multi Language |Offline reading | PDF