गोमांस खाणे सोडल्याने जागतिक मृत्यूदर न्यून होईल ! – जागतिक आर्थिक परिषदेचा अभ्यास

असा अभ्यास भारतात पुरोगामी, निधर्मीवादी, गोमांसप्रेमी यांसमवेत भाजप सरकार का करत नाही ?

नवी देहली – गोमांस न खाल्ल्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतील. त्याचसमवेत  ‘ग्रीन हाऊस गॅस’चे उत्सर्जनही न्यून होईल. त्यामुळे शक्यतो लोकांनी गोमांस खाणे टाळावे, असे जागतिक आर्थिक परिषदेने म्हटले आहे. एका अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारावर परिषदेने हा दावा केला आहे. जागतिक आर्थिक परिषदेसाठी ‘ऑक्सफर्ड मार्टिन स्कूल’ने हा अभ्यास केला होता. ‘निरोगी आरोग्यासाठी विविध फळभाज्यांतील बिया, वाटाणे आणि मायक्रोप्रोटिन यांच्यात अधिक प्रमाणात आवश्यक घटक असतात’, असे यात म्हटले आहे.

जागतिक आर्थिक परिषदेने म्हटले आहे की,

१. गोमांस खाणे सोडल्याने लोकांचे आरोग्य सुधारेल. त्याचसमवेत पर्यावरणाचे रक्षणही शक्य होईल. सध्या जगात जेवढे मृत्यू होत आहेत, त्याला गोमांसाचे सेवन हेसुद्धा एक कारण आहे. जर गोमांस खाणे बंद केले गेले, तर जागतिक स्तरावर २.४ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण न्यून होईल.

२. श्रीमंत देशांमध्ये गोमांस खाण्याचे प्रमाण अधिक असल्याने तेथे याचे सेवन न्यून केले गेले, तर त्या देशांमध्ये ५ टक्क्यांपर्यंत मृत्यूचे प्रमाण न्यून होईल. गोमांस खाण्यापेक्षा इतर ज्या पदार्थांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक आहे, त्यांचे सेवन करणे सर्वांच्याच लाभाचे आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही न्यून होईल.

३. वर्ष २०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जापेक्षा अधिक होईल. त्यामुळे जागतिक स्तरावर गोमांस खाण्याचे प्रमाणही आणखी वाढेल. त्या वेळी ग्राहकांची गोमांसाची मागणी पूर्ण करणे शक्य होणार नाही, असे जागतिक आर्थिक परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक डॉमिनिक वाघ्रे यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF