ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना मी बॉम्बने उडवून देईन ! – भाजपचे आमदार विक्रम सैनी

  • भारतात कायद्याचे राज्य असल्यामुळे अशी वक्तव्ये करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • असे असले, तरी ‘भारतात असुरक्षित वाटते’, असे म्हणून कोट्यवधी राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलणे आवश्यक !

मुझफ्फरनगर – भारतात ज्यांना असुरक्षित वाटते ते लोक देशद्रोही आहेत. सरकारने असे बोलणार्‍यांच्या विरोधात कायदाच करायला हवा. या कायद्याच्या आधारे त्यांना शिक्षा करता येईल. (यासाठी सैनी सरकारवर दबाव का आणत नाही ? – संपादक) सरकारने माझ्याकडे असे खाते दिले, तर मी अशा लोकांना बॉम्बनेच उडवून देईन, अशी विधाने उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार विक्रम सैनी यांनी केली आहेत. ते अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते. ‘ही माझी वैयक्तिक भावना आहे. याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now