प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील कुंभपर्वाच्या निमित्ताने धर्मप्रसारासाठी येणारे धर्मप्रेमी आणि साधक यांच्या भोजनासाठी धनरूपात साहाय्य करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा !

सर्वत्रच्या अर्पणदात्यांना अन्नदान करण्याची सुसंधी !

१. कुंभपर्वाचे महत्त्व

‘१.१.२०१९ ते २८.२.२०१९ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्व आहे. या काळात संपूर्ण भारतभरातून ३ कोटी भाविक प्रयागराज येथे येतात. या काळात सर्व देवता, अनेक संत आदी प्रयागक्षेत्री उपस्थित असतात. या पर्वाच्या ठिकाणी आणि या काळात केलेल्या साधनेचे फळ अन्य स्थळकाळाच्या तुलनेने  १ सहस्र पटींनी अधिक मिळते.

२. धर्मप्रसार कार्यासाठी भारतभरातील १५० धर्मप्रेमी आणि साधक यांचे २ मास कुंभक्षेत्री वास्तव्य !

या काळात साधनेसाठी अधिकाधिक वेळ दिल्यास देवता आणि संत यांचा आशीर्वाद लाभून इच्छित कार्य अल्पावधीत पूर्णत्वाला जाते. या पुण्यकाळाचा साधनेसाठी लाभ करून घेऊन धर्मप्रसार कार्य सर्वत्र पोहोचवण्याच्या उद्देशाने भारतभरातील १५० धर्मप्रेमी आणि साधक सेवेसाठी कुंभक्षेत्री वास्तव्याला असणार आहेत. त्यांचा ६० दिवसांच्या (२ मासांच्या) कुंभकाळामध्ये अल्पाहार आणि भोजन यांसाठी येणारा व्यय खाली दिला आहे.

जे अर्पणदाते कुंभपर्वानिमित्त येणारे धर्मप्रेमी आणि साधक यांच्यासाठी अल्पाहार (न्याहारी) अन् भोजन यांकरता धनरूपात साहाय्य करून धर्मकार्यात सहभागी होऊ इच्छितात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

अन्नदानासाठी संस्थेला धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.

https://www.sanatan.org/en/donate येथेही दान (अर्पण) करण्याची सुविधा उपलब्ध आहे.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, गोवा.

अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व !

हिंदु धर्मशास्त्रामध्ये वर्णिलेल्या महादानांपैकी ‘अन्नदान’ हे महत्त्वाचे दान आहे. जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यामुळे त्याने शक्य होईल तेवढे अन्नदान करावे. ‘सद्भावनेने ‘सत्पात्रे अन्नदान’ केल्यास अन्नदात्याला त्याचे उचित फळ मिळते, तसेच सर्व पातकांतून त्याचा उद्धार होऊन तो ईश्‍वराच्या जवळ जातो’, असे धर्मशास्त्र सांगते. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तींसाठी अन्नदान केल्यास अन्नदात्याला आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो. प्रयागक्षेत्री येणारे धर्मप्रेमी आणि साधक यांच्यासाठी अन्नदान केल्यास अन्नदानाचे फळ तर मिळेलच आणि त्याचबरोबर कुंभपर्वाचा आध्यात्मिक स्तरावरही लाभ होईल !


Multi Language |Offline reading | PDF