मानाच्या सासन काठ्या आणि दांडपट्टा यांवरील बंदी उठवण्यासाठी श्रीक्षेत्र पाल (सातारा) येथे मातंग सेनेचे महाधिवेशन

  • हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर बंदी घालणारे प्रशासन इतर पंथियांच्या धार्मिक कृतींमध्ये कधी हस्तक्षेप करते का ? हिंदूंच्या अतिसहिष्णुपणाचा अपलाभ घेत प्रशासनाने जिल्ह्यातील विविध गावांतील यात्रांमधील धार्मिक प्रथांवर बंदी लादली आहे !
  • मानाच्या सासन काठ्या आणि क्षात्रतेजाचे प्रतीक असणार्‍या दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके यांवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या मातंग सेनेचा आदर्श समस्त हिंदु बांधवांनी घ्यावा !

सातारा, ४ जानेवारी (वार्ता.) – श्रीक्षेत्र पाल (सातारा) येथे श्री खंडोबादेवाच्या यात्रेत मानाच्या सासन काठ्या आणि दांडपट्टा प्रात्यक्षिके सादर करण्याचा मान मातंग समाजाला होता; मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या प्रथेवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवण्यासाठी श्रीक्षेत्र पाल येथे १७ आणि १८ जानेवारी या दिवशी अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरील मैदानात मातंग सेनेचे महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now