श्री. निषाद देशमुख या ज्ञानप्राप्तकर्ता साधकाची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर त्याला स्वतःमध्ये जाणवलेले पालट

‘पातळी वाढल्यामुळे काही वेळा काही जणांवर वरच्या स्तरावरील वाईट शक्ती आक्रमण करतात; पण त्यात लवकर सुधारणा होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

श्री. निषाद देशमुख

१ नोव्हेंबर २०१८ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केल्यापासून ८ डिसेंबर २०१८ पर्यंत श्री. निषाद देशमुख यांना स्वतःमध्ये जाणवत असलेले चांगले आणि त्रासदायक पालट

१ अ. चांगले पालट

१ अ १. ज्ञान मिळवण्याच्या सेवेच्या संदर्भातील पालट

अ. ‘१ नोव्हेंबर २०१८ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर ज्ञान मिळवतांना माझ्या मनाच्या एकाग्रतेमध्ये पुष्कळ वाढ झाली आहे’, असे माझ्या लक्षात आले.

आ. पूर्वीच्या ज्ञानाच्या तुलनेत आता मिळणार्‍या ज्ञानाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिक वेळा ‘आवडले’ असे म्हटले आहे.

इ. पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले विचारत असलेल्या प्रश्‍नांवर ज्ञान मिळवतांना मला पुष्कळ मोठे ज्ञान मिळायचे. आता संक्षिप्त आणि आवश्यक तेवढ्या शब्दांत ज्ञान मिळते.

ई. २३.११.२०१८ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘त्रास होतांना किंवा ज्ञान मिळवतांना काही सुचत नसल्यास संकलन करणे शेष राहिलेल्या ज्ञानाच्या धारिकांचे संकलन करावे’, असे सांगितले. त्या वेळी ‘मागील ३-४ मासांपासून मला असे त्रास होतच नाहीत’, असे माझ्या लक्षात आले.

उ. पूर्वी मिळालेल्या क्लिष्ट ज्ञानाला आता मला सहजतेने सोप्या भाषेत साधकांना समजवता येते.

१ अ २. नामजप आणि प्रार्थना यांच्या संदर्भातील अनुभूती

अ. आता अधिकतर वेळा माझा नामजप न होता माझे मन निर्विचार स्थितीत असते.

आ. २०.११.२०१८ या दिवशी पाचव्या पंचमुखी हनुमान-कवच यज्ञाच्या वेळी वैखरी वाणीत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामजप करतांना माझा देह श्रीरामासारखा होण्याची, म्हणजे ‘स्वरूप मुक्तीची’ अनुभूती आली.

इ. ३०.११.२०१८ या दिवशी एका सूक्ष्म परीक्षणासाठी मी समुद्रतटावर गेलो होतो. त्या ठिकाणी समुद्रदेवाला समष्टीसाठी प्रार्थना केल्यावर गणपतीचा आकार उमटलेल्या शंखाचा एका तुकडा मला मिळाला. अशी दैवी प्रचीती मिळण्याची ही पहिली वेळ होती.

ई. पूर्वीच्या तुलनेत माझी भावजागृती होण्याचे प्रमाण वाढले आहे.

१ अ ३. साधकांच्या संदर्भातील अनुभूती

अ. अनेक साधकांना मला सहजतेने साधनेचे तत्त्व सांगता येतात. पूर्वी मला तसे सांगता यायचे नाही.

आ. पूर्वीच्या तुलनेत माझे इतर साधकांशी बोलण्याचे प्रमाण वाढले आहे.

इ. पूर्वी मला साधकांचे नाव, त्यांची वर्तमान स्थिती, नातेवाईक अशी काही माहिती लक्षात रहायची नाही. आता काही प्रमाणात मला ते सर्व त्या त्या वेळी आठवते.

१ अ ४. कृतज्ञता : वरील सर्व पालट होण्यासाठी मी वेगळे काहीच प्रयत्न केले नाही. मी प्रसारसेवेत सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्या समवेत असतांना त्यांनी एकदा मला सांगितले होते ‘ज्या प्रकारे लेखासेवक, प्रसारसेवक अशी समष्टी दायित्वे असतात, त्या प्रकारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी किंवा संतपद, म्हणजे समष्टीच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याल्या दिलेले दायित्व.’ मला आता येत असणार्‍या विविध अनुभूतीतून गुरुच माझ्यात हे सर्व पालट घडवून आणून मला सद्गुरु पिंगळेकाकांनी सांगितलेल्या तत्त्वाची काही प्रमाणात अनुभूती घेता येत आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

१ आ. त्रासदायक पालट

१ आ १. शारिरीक स्तरावर झालेले नकारात्मक पालट : पूर्वीच्या तुलनेत माझ्यातील पित्तामध्ये वाढ झाली आहे. यामुळे विविध शारीरिक त्रासांमध्ये वाढ झाली आहे. या संदर्भात आधुनिक वैद्य आणि आयुर्वेदीय वैद्य यांचे उपचार घेणे चालू केले आहे.

१ आ २. मनाच्या स्तरावर झालेले नकारात्मक पालट

अ. पूर्वीच्या तुलनेत विसरण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. यामुळे अनेक महत्त्वाचे निरोप किंवा साहित्य मी विविध ठिकाणी विसरतो.

आ. पूर्वीच्या तुलनेत माझे स्वभावदोष अधिक उफाळून येत आहे. यातही ‘चूक न स्वीकारणे’ हा दोष अत्यंत प्रबळ झाला आहे. यामुळे कुटुंबातील साधकांना आणि अन्य साधकांना त्याचा त्रास होत आहे. या दोषावर प्रायश्‍चित घेतले आहे आणि स्वयंसूचना घेणेही चालू आहे.

इ. पूर्वीच्या तुलनेत फलकावर चुका लावण्यातही सवलत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे माझ्याकडून कधी-कधी आठवड्याभर फलकावर चुका न लिहिणे असेही होत आहे.

१ आ ३. बुद्धीच्या स्तरावर जाणवत असलेले नकारात्मक पालट

अ. पूर्वीच्या तुलनेत मला स्वभावदोष आणि अहं यांचे लगेच आकलन होत नाही. खूप चिंतन करावे लागते किंवा इतरांना त्यांची जाणीव करून द्यावी लागते.

आ. पूर्वीच्या तुलनेत माझा संकलनाचा स्तर उणावला आहे. या संदर्भात एका संतांनी ‘चुकांच्या अभ्यास करणे. पूर्वी चुकांचे प्रमाण अल्प होते’, या शब्दांमध्ये माझ्या स्थितीची जाणीव करून दिली.

१ आ ४. आध्यात्मिक स्तरावर जाणवत असलेले नकारात्मक पालट

अ. ५.१२.२०१८ या दिवशी एका प्रयोगासाठी माझी यू.टी.एस् चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये माझ्यात नकारात्मक ऊर्जा (आई.आर आणि यू.व्ही.) आढळली. या पूर्वी २३.४.२०१८ या दिवशी घेण्यात आलेल्या यू.टी.एस् चाचणीमध्ये माझ्यात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आढळली नव्हती.

आ. ५.१२.२०१८ या दिवसापासून मला शौचाद्वारे रक्त बाहेर पडण्याचा त्रास होऊ लागला. तीव्र आक्रमण झाल्यावर मला असा त्रास होतो; पण उपाय केल्यावर त्रास एका दिवसात नाहीसा होतो. या वेळी सलग तीन दिवस उपाय करूनही त्रास कमी झाले नाहीत. ८.१२.२०१८ या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना त्रासाच्या संदर्भात आध्यात्मिक उपाय विचारल्यावर त्यांना तळहाताची मुद्रा करून मूलाधार आणि आज्ञा या चक्रांवर न्यास करायला सांगितले.

इ. ६.१२.२०१८ या दिवशी भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमात होत असलेले ‘महाकाली पूजन आणि यज्ञ’ यांचे परीक्षण करतांना माझ्या उजव्या हातात उपायांसाठी बांधलेला मेंढीचा दोरा आपोआप तुटून पडला. यानंतर सलग १०-१५ मिनिटे माझ्या उजव्या तळहाताला खाज येत होती. सनातनचे संत पू. (डॉ.) गाडगीळकाका यांना माझा हात दाखवल्यावर त्यांना हातातून उष्ण शक्ती बाहेर पडत असून हाताला सूज आल्याचे लक्षात आले.

ई. माझ्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी पूर्वीपासून केस अल्प आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्रासदायक शक्ती असल्याने आणि मला पित्त असल्याने केसांचे प्रमाण अल्प आहे. ६.१२.२०१८ या दिवशी भृगु महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमात होत असलेले ‘महाकाली पूजन आणि यज्ञ’ यांचे परीक्षण करतांना मला माझ्या ब्रह्मरंध्रातून शक्ती बाहेर पडतांना जाणवली. मी २ – ३ वेळा ‘उपायांमुळे स्थानातील त्रासदायक शक्ती बाहेर पडत असल्याने असे जाणवत आहे का ?’, असे परीक्षण करून पाहिले; पण प्रत्येक वेळी ‘समष्टीसाठी शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे चुकीचे उत्तर मला मिळाले; कारण ‘केवळ संतांच्या ब्रह्मरंध्रातून समष्टीसाठी शक्ती प्रक्षेपित होते’, असे ज्ञान मला पूर्वी मिळाले आहे.

उ. ७.१२.२०१८ या दिवशी रात्री पुढच्या दिवसाच्या अल्पाहार सेवेसाठी आश्रमात थांबल्यावर मला रात्रभर झोप येत नव्हती. ‘अधून-मधून डोळा लागल्यावर मी आणि पू. (डॉ.) गाडगीळकाका मिळून वाईट शक्तींशी सूक्ष्मातील युद्ध करत आहोत’, असे चित्र मला दिसायचे.

ऊ. ८.१२.२०१८ या दिवशी अल्पाहार सेवेनंतर मला होणार्‍या त्रासात पुष्कळ वाढ झाली. मला माझे डोळे पिवळे झाल्याचे दिसले. त्यानंतर मला मळमळू लागले, थकवा आला आणि थंडी वाजून ताप आल्यासारखे झाले. यामुळे मी दिवसातील ३ – ४ घंटे झोपून होतो.

१ इ. क्षमायाचना : गुरूंनी मला समष्टीसाठी सेवा करायला सांगितलेले असतांनाही माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे मला अपेक्षित तसे करता येत नाही आहे. याउलट सेवा करतांना स्वतःतील स्वभावदोष आणि अहं मी जपत असल्याने मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासांमध्येही वाढ झाली आहे. यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांच्या चरणी क्षमायाचना करतो आणि त्यांनी स्वभावदोष, अहं आणि आध्यात्मिक त्रास अल्प करण्यासाठी मला साहाय्य करावे, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना.’

– श्री. निषाद देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१२.२०१८, रात्री ७.१७)


Multi Language |Offline reading | PDF