देवद (पनवेल) येथील सनातनच्या साधिका श्रीमती वसुंधरा तुकाराम गवळी (८६ वर्षे) यांनी गाठली ६३ टक्के आध्यात्मिक पातळी !

देवद (पनवेल) – येथील श्रीमती वसुंधरा गवळीआजी यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे १ जानेवारीला एका कौटुंबिक कार्यक्रमात घोषित करण्यात आले. ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या रायगड येथील साधिका सौ. संगीता लोटलीकर यांनी ही आनंददायी घोषणा केली. सौ. लोटलीकर यांनी शाल आणि प्रसाद देऊन आजींचा सत्कार केला.

१. श्रीमती गवळी आजी यांचा सत्कार करतांना सौ. संगीता लोटलीकर
२. खुर्चीत बसलेले डावीकडून श्री. हेमंत म्हात्रे (जावई), श्रीमती वसुंधरा गवळी, सौ. वीणा म्हात्रे (मुलगी); पाठीमागे उभे असलेले डावीकडून श्री. सागर हेमंत म्हात्रे (ज्येष्ठ नातू), श्री. आलाप हेमंत म्हात्रे (कनिष्ठ नातू) आणि सौ. स्वाती आलाप म्हात्रे (नातसून)

आजी पूर्वीपासून प.पू. कलावती आई यांनी सांगितल्यानुसार साधना करत होत्या. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी कुलदेवतेचा जप चालू केला.

श्रीमती वसुंधरा गवळीआजींची कन्या सौ. वीणा म्हात्रे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि जावई श्री. हेमंत म्हात्रे यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, तसेच नातू श्री. सागर हेमंत म्हात्रे यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे. हे तिघेही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात.

या वेळी सौ. विणा म्हात्रे म्हणाल्या, ‘‘आजी प्रत्येकामध्ये गुरुदेवांचे रूप पहातात. दोन दिवसांपूर्वी त्या पुष्कळ रुग्णाईत होत्या. त्यांना धाप लागत होती. अशा वेळी त्यांना रुग्णालयात भरती करावे लागते. त्या वेळी जवळच असलेल्या सनातनच्या आश्रमातील साधक वैद्य त्यांच्या तपासणीसाठी आले असता त्यांना आजींनी हात जोडून नमस्कार केला.

आजी गिरगाव (मुंबई) येथे रहात होत्या. त्या प.पू. कलावती आईंच्या सत्संगात जात त्यासह सनातनच्या सत्संगातही येत. प्रसाराची सेवा करणार्‍या साधकांसाठी आजी खाऊ घेऊन जात असत. आजही घरी कोणीही आले तरी त्याला काहीतरी द्यायला हवे, असे आजींना वाटत असते. आजी सतत नामजप करत असतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र त्यांच्या पलंगाजवळ सतत असते.’’


Multi Language |Offline reading | PDF