बीड जिल्हा परिषदेत १०० कोटी रुपयांचा घोटाळा

घोटाळेबाज न सुटण्यासाठी पुन्हा चौकशीचे पंचायत राज समितीचे आदेश

बीडसारख्या जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा झालेला घोटाळा महाराष्ट्राला लज्जास्पदच !

बीड – येथील जिल्हापरिषदेत १०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी चौकशी पूर्ण झाली, अशी साक्ष सचिवांनी पंंचायत राज समिती समोर नोंदवली. त्यांनी दिलेली उत्तरे बघून समितीने संताप व्यक्त केला. दोषी अधिकार्‍यांना केवळ ताकीद देण्यात आली.

‘बीड जिल्हा परिषदेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांच्या कालावधीत अनुमाने १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांना पुन्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद देण्यात आले. चौकशी करून झालेल्या कारवायाही थातुरमातुरच होत्या.  भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम झाले, ही गंभीर गोष्ट आहे. जिल्हा परिषदेतील घोटाळ्याची पुन्हा चौकशी करा. आयुक्तांची साक्ष पुन्हा नोंदवा. एकही घोटाळेबाज सुटला गेला नाही पाहिजे’, असे आदेश पंचायत राज समितीने दिले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF