राफेल प्रकरणी यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

नवी देहली – राफेल विमान खरेदीमध्ये कोणताही घोटाळा झाला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या निर्णयावर भाजप सरकारमधील माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, तसेच अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयाने त्याच्या निर्णयाची समीक्षा करावी, अशी विनंती याद्वारे करण्यात आली आहे.

राफेलच्या निर्णयात अनेक त्रुटी आहेत. हा निर्णय सरकारने दाखल केलेल्या चुकीच्या दाव्यांवर आधारित आहे. सरकारने हस्ताक्षर न करता ‘सीलबंद’ पाकीटात कागदपत्रे दिली होती. हे न्यायालयीन सिद्धांताचे उल्लंघन आहे, असेही या पुनर्विचार याचिकेत म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now