विमा न काढल्यास वाहने जप्त होणार ! – दिवाकर रावते, परिवहनमंत्री

मुंबई – वाहनाचा विमा न काढल्यास वाहन जप्त करण्याची चेतावणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. मद्य पिऊन गाडी चालवतांना पकडल्यावर सहा मासांसाठी परवाना रहित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परिवहन आणि वाहतूक पोलीस यांची ३१ डिसेंबर या दिवशी बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय झाला. (एकीकडे मद्य पिण्यासाठी परवाने देऊन त्याद्वारे महसूल जमा करायचा, मद्यपींनी वाहने चालवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्याच महसुलातून पोलिसांना वेतन द्यायचे आणि आरोपींचा परवाना निलंबित करायचा, हा हास्यास्पद प्रकारच होय ! यापेक्षा सरकार मद्यबंदी का करत नाही ? – संपादक)

तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) विमा अनिवार्य करण्यात आला असला, तरी देशभरातील अनुमाने ५० टक्के वाहने अद्याप या विम्याने सुरक्षित नाहीत. त्यामुळे तृतीय पक्ष विम्यासंबंधी नियमाची कठोर कार्यवाही करण्याचे निर्देशही केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत. थर्ड पार्टी विम्याची रक्कम पूर्णपणे माफ करावी, अशी मागणी ट्रकमालकांच्या संघटनेने शासनाकडे केली होती. याविषयी योग्य निर्णय घेतला जाईल, असे शासनाने या संघटनेला आश्‍वासन दिले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now