मराठी साहित्य संमेलनात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ महिलांचा सन्मान  करण्यात येणार !

नागपूर –  विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ महिलांचा यवतमाळ येथे होणार्‍या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सन्मान करण्यात येणार आहे. या महिलांना साडी-चोळी आणि भेटवस्तू देण्यात येईल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी १ जानेवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मदन येरावार पुढे म्हणाले की…

१. डॉ. वि.भि. कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय, विदर्भ साहित्य संघ शाखा यवतमाळ यांच्या वतीने यवतमाळ येथे ११, १२ आणि १३ जानेवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे हे साहित्य संमेलन होत आहे.

२. अनेक दानशूर व्यक्तींनी या संमेलनासाठी साहाय्याचा हात पुढे केला आहे. संमेलनासाठी येणार्‍या निमंत्रितांची निवासाची व्यवस्था स्वतःच्या घरी करण्याची सिद्धता अनेकांनी दर्शवली आहे.

३. संमेलनासाठी येणार्‍या अनेक नामवंत निमंत्रितांनी मानधन नाकारत असल्याचे सांगितले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now