मोहन भागवत यांनी ४ वर्षांत मोदी यांना कधीही राममंदिर बांधण्यास सांगितले नाही ! – डॉ. प्रवीण तोगाडिया यांचा दावा

कर्णावती (गुजरात) – केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून ४ वर्षे मी विश्‍व हिंदु परिषदेचा कार्याध्यक्ष होतो; मात्र या ४ वर्षांत सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एकदाही राममंदिर बांधण्याचा आदेश दिला नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे. ते एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

डॉ. तोगाडिया यांनी मांडलेली सूत्रे

१. ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आधी दसर्‍यापासून भाजप आणि संघ यांच्याकडून राममंदिराचे सूत्र जाणीवपूर्वक उपस्थित करण्यात येऊ लागले.

२. मोदी यांनी त्यांच्या मुलाखतीत ‘राममंदिरावर अध्यादेश काढणार नाही’, असे म्हटल्यावर संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनीही त्यांच्या विधानाचे समर्थन केले.

३. पंतप्रधान मोदी अजूनही अयोध्येला गेलेले नाहीत. त्यांना राममंदिरासाठी काही करायचेच नाही. त्यामुळे ते तेथे जाण्याचे टाळत आहेत. मोदी यांच्या राममंदिराच्या विधानावर संघाला आक्षेप नाही. यावरून स्पष्ट होते की, भाजपला हिंदूंची मते हवी आहेत. आता भाजप हिंदुत्वापासून वेगळा झाला आहे.


Multi Language |Offline reading | PDF