राममंदिराविषयी जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्याकडून कुंभक्षेत्री लावण्यात आलेले फलक ठरत आहेत लक्षवेधी !

कुंभक्षेत्री जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी उभारलेला फलक

प्रयागराज (कुंभनगरी), ३ जानेवारी (वार्ता.) – येथे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होणार्‍या कुंभपर्वात जनजागृतीसाठी विविध संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था विविध प्रकारचे फलक लावत आहेत. यात अयोध्येत राममंदिराची उभारणी लवकरात लवकर व्हावी; म्हणून महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी धनुष्यधारी श्रीरामाचे चित्र छापून अनेक लक्षवेधी फलक लावले आहेत.

या फलकांवरील ‘येशु, अल्लाह कर रहे, वेटिकन, मक्का पर राज, हिन्दुओं का राम फिर, बेघर क्यों हैं आज !’, ‘जन्मभूमि पर अगर, नहीं राम का अधिकार, राम तेरे देश में, हिन्दू होने पर धिक्कार !’, ‘बढ आगे तिरपाल हटाओ, वंशज होने का धर्म निभाओ !’, ‘अगर अब भी राममंदिर न बना पाओगे, तो आनेवाली पीढी को क्या मुंह दिखाओगे !’, अशी भाजप सरकारला अंतर्मुख करणारी आणि कृतीप्रवण करणारी वाक्ये भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे कुंभक्षेत्री हे फलक चर्चेचा विषय बनले आहेत. या कुंभपर्वात राममंदिर उभारणीचे सूत्र सर्वांत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF