(म्हणे) ‘अयोध्येत राममंदिर होणारच !’ – सरसंघचालक

  • २ वेळा सत्ता येऊनही ज्यांनी राममंदिर उभारले नाही, ते आता उभारतील, यावर कोण विश्‍वास ठेवणार ?
  • राममंदिराच्या उभारणीसाठी संघाने गेल्या साडेचार वर्षांत भाजपला अध्यादेश काढायला भाग पाडणे हिंदूंना अपेक्षित होते.

नागपूर – अयोध्येत राममंदिर होईल आणि लवकरच उभारणीला आरंभ होईल, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते पुढे म्हणाले, ‘‘राममंदिर व्हावे, ही प्रभु श्रीरामाचीच इच्छा आहे. मंदिर लवकरात लवकर व्हावे, ही आमची भूमिका आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या मुलाखतीत राममंदिर उभारणीच्या संदर्भात कुठलीही नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी राममंदिर होणार नाही, असे कुठेही म्हटलेले नाही. केवळ ‘न्यायालयीन प्रकियेनंतर विचार करू’, असे म्हटले. मंदिराचे सूत्र ६९ वर्षांपूर्वीचे आहे. राममंदिर उभारणीला फार वेळ झाला आहे; मात्र आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार नाही; कारण वेळ कधीही पालटू शकते.’’


Multi Language |Offline reading | PDF