हेरगिरी करणारे भारताचे ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा

इस्लामाबाद – पाकिस्तानी सैन्याने नियंत्रणरेषेजवळील बाग क्षेत्रात हेरगिरी करणारे भारतीय ड्रोन उद्ध्वस्त केले, असा दावा पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते आणि मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्वीटद्वारे केला आहे; मात्र भारतीय सैन्याने हा दावा फेटाळला आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सैन्याने सांगितले आहे. गफूर यांनी, ‘गेल्या वर्षात पाकने भारताचे ४ ड्रोन उद्ध्वस्त केले आहेत’, असेही म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now