काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून पोलिसाची घरात घुसून हत्या

  • काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत जिहादी आतंकवादी गेल्या काही मासांपासून पोलिसांना लक्ष्य करून त्यांच्या हत्या करत आहेत; मात्र त्या रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. पोलिसांचे रक्षण करू न शकणारे भाजप सरकार काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन कधीतरी करू शकते का ?
  • पाकला नामशेष केल्याविना हा आतंकवाद संपणार नाही, हे पंतप्रधान मोदी यांना कधी समजणार आणि ते तशी कृती कधी करणार ?

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – पुलवामा जिल्ह्यातील हंसान पायीन या भागात जिहादी आतंकवाद्यांनी समीर मीर या पोलिसाच्या घरात घुसून केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षादलांनी परिसरात आतंकवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबवली आहे. वर्ष २०१८ मध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात एकूण सुरक्षादलांचे सैनिक आणि पोलीस मिळून ९५ जण हुतात्मा झाले. यात जम्मू-काश्मीर पोलीस दलातील ४५ पोलिसांचा समावेश आहे.


Multi Language |Offline reading | PDF