अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे इस्लामिक स्टेटच्या दोघा आतंकवाद्यांच्या ५ ठिकाणांवर धाडी

अमरोहा (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे पुन्हा एकदा धाड घातली. ३१ डिसेंबरच्या रात्री येथील ५ ठिकाणी धाड घालण्यात आली. २६ डिसेंबरला अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या १० आतंकवाद्यांपैकी दोघांच्या ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या. या वेळी उत्तरप्रदेशचे आतंकवादविरोधी पथकही सहभागी होते. या दोघा आतंकवाद्यांच्या घरातही धाड घालून तेथील लोकांची चौकशी करण्यात आल्यावर काही जणांना कह्यात घेण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF