राममंदिरासाठी न्यायालयाच्या निर्णयाची जगाच्या अंतापर्यंत वाट पहायची का ? – विहिंप

  • हे ठाऊक होते, तर गेल्या साडेचार वर्षांत विहिंपने भाजपवर दबाव का निर्माण केला नाही ? आता असे बोलून काही साध्य होणार आहे का ? पुढील निवडणुकीत भाजपचे सरकार आले नाही, तर राममंदिर होईल, असे विहिंपला वाटते का ?
  • भाजप, संघ आणि विहिंप यांनी आता राममंदिरावरून हिंदूंना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न बंद करावा आणि हिंदूंनीही यांच्यावर विश्‍वास ठेवण्याऐवजी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हावे !

नवी देहली – राममंदिराच्या उभारणीच्या संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाची जगाच्या अंतापर्यंत वाट पाहायची का ?, असा प्रश्‍न विश्‍व हिंदु परिषदेने येथे पत्रकार परिषद घेऊन विचारला. ‘राममंदिरासाठी न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी अध्यादेश काढणार नाही’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत म्हटल्यावर विहिंपचे प्रमुख आलोक कुमार यांनी वरील प्रश्‍न विचारला. ‘३१ जानेवारीला प्रयागराज येथे धर्मसंसद होईल. त्यात ही मागणी पूर्ण करण्यासाठी काय पाऊल उचलले पाहिजे, याचा निर्णय घेतला जाईल. संत जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. राममंदिराच्या संदर्भात आमच्या लढ्यास यश येईल’, असा विश्‍वासही आलोक कुमार यांनी व्यक्त कला. (संत सांगतील, असे विहिंप वागत असती, तर तिने साडेचार वर्षांत ‘भाजप राममंदिर उभारेल’, यावर विश्‍वास ठेवला नसता ! – संपादक)

 विहिंपचे प्रमुख आलोक कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की,

१. सुमारे ६९ वर्षांपासून राममंदिराचा प्रश्‍न न्यायालयात आहे. अनंत काळापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. हिंदु समाज न्यायालयाच्या निर्णयाची आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत याच अधिवेशनात राममंदिरासाठी कायदा व्हावा, असे प्रयत्न आम्ही करत आहोत.

२. राममंदिराच्या सूत्रावर येत्या ४ जानेवारीला सुनावणी होणार आहे; मात्र अद्याप यासाठी खंडपिठाचीही नियुक्ती झालेली नाही. काही अपिलांची प्रक्रियाही शिल्लक आहे. त्यामुळे याची सुनावणी अद्याप खूपच दूर आहे, असे आम्हाला वाटते.

३. संसदेद्वारे कायदा बनवून राममंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त करायला हवा.

भाजप सरकारने याच कार्यकाळात राममंदिर  उभारण्याचे आश्‍वासन पूर्ण करावे ! – रा.स्व. संघ

पंतप्रधान मोदी यांचे विधान आम्हाला राममंदिराच्या निर्माणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल वाटते. भाजपने वर्ष १९८९ मधील पालमपूर अधिवेशनात राममंदिरासाठी कायदा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने वर्ष २०१४ मध्ये घोषणापत्रात ‘राममंदिराच्या निर्माणासाठी घटनेच्या चौकटीत राहून प्रयत्न करू’, असे आश्‍वासन दिले होते. (गेल्या साडेचार वर्षांत घटनेच्या चौकटीत राहूनच अध्यादेश काढून राममंदिर बांधता आले असते; मग भाजपने तसे का केले नाही, हे संघ मोदी यांना का विचारत नाही ? – संपादक) देशातील जनतेने त्यावर विश्‍वास ठेवून भाजपला बहुमताने निवडून आणले. आता सरकारने याच कार्यकाळात राममंदिराचे आश्‍वासन पूर्ण करावे, अशी देशातील जनतेची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now