खिडकीतून कचरा टाकणार्‍या ९०० वसाहतींना महापालिकेची नोटीस !

मुंबई – दक्षिण मुंबई येथील घराच्या खिडकीतून दोन इमारतींच्या मध्यभागी असलेल्या गल्लीत कचरा टाकणार्‍या ९०० वसाहतींना महापालिकेने नोटीस पाठवली आहे. खिडकीतून कचरा टाकल्यामुळे या गल्ल्यांना कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. त्याचा परिणाम जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होऊन स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. (आपली घरे नीटनेटकी सजवणार्‍यांनी अशा प्रकारे कचरा घरातून बाहेर टाकून घराच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ करणे, हे त्यांच्या दरिद्री मनोवृत्तीचेच द्योतक ! – संपादक) नोटीस पाठवलेल्या काही जणांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू करण्यात आली असल्याचे सहायक आयुक्त, सी विभाग सुनील सरदार यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF