ख्रिस्ती नववर्षासाठी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत मद्यपान करून वाहने चालवणार्‍या ४५५ चालकांवर कारवाई !

मद्यविक्रीला प्रोत्साहन देणारे सरकार याकडे लक्ष देईल का ?

मुंबई – ३१ डिसेंबर ते १ जानेवारीला सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी मद्याच्या नशेत वाहने चालवणार्‍या ४५५ चालकांवर कारवाई करतांना त्यांच्याकडून दंड वसूल केला आणि वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्सही) जप्त केली. नाकाबंदीच्या वेळी ९ सहस्र ८०० संशयास्पद चालकांना श्‍वास विश्‍लेषक यंत्राद्वारे पडताळण्यात आले. वाहन वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या १ सहस्र ११४ जणांवर दंडात्मक कारवाई केली.

एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी १ सहस्र ५३३ चालकांना पकडले होते. त्यांतील ७६ जणांनी मद्यपान केले होते. न्यायालयाच्या आदेशांनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF