नरभक्षक वाघाचे नाव ‘मुस्तफा’ ठेवल्याने संतप्त मुसलमानांकडून नाव पालटण्याची मागणी

कुठे एका नरक्षभक वाघाला धर्मातील पवित्र नाव ठेवल्याचा विरोध करणारे धर्मप्रेमी मुसलमान, तर कुठे देवतांच्या नावाचा अवमान करणारे धर्मद्रोही हिंदू ! असे हिंदू मुसलमानांकडून धर्मप्रेम शिकतील का ?

लखीमपूर (उत्तरप्रदेश) – येथील मुस्तफाबाद गावामध्ये एका नरभक्षक वाघाचे नाव ‘मुस्तफा’ ठेवण्यात आल्याने मुसलमान संघटनांकडून विरोध होत आहे. या संघटनांनी  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन वाघाचे नाव पालटण्याची मागणी केली आहे.

या वाघाला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्ष २०१६ मध्ये पकडले होते. त्याने ६ जणांना ठार केले होते. त्यानंतर त्याला लक्ष्मणपुरीतील प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आले आणि त्याचे ‘मुस्तफा’ असे नामकरण करण्यात आले. ही माहिती मिळताच ‘खिरी एकता परिषदे’च्या नेतृत्वाखाली मुसलमानांनी जिल्हाधिकारी शैलेंद्रकुमार सिंह यांना निवेदन दिले. यात म्हटले की, इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत महंमद मुस्तफा यांचे नाव नरभक्षक वाघाला दिल्याने मुसलमान समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now