इस्लामिक स्टेटचे आतंकवादी वर्ष २००९ पासून आक्रमणाचे नियोजन करत होते !

९ वर्षांनंतर भारतातील अन्वेषण यंत्रणांना ही माहिती मिळते हे लज्जास्पद होय ! या ९ वर्षांत या आतंकवाद्यांनी आक्रमण केले असते, तर काय झाले असते, याचा विचार अन्वेषण यंत्रणा करणार आहेत का ?

नवी देहली – देहली आणि उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात आलेले इस्लामिक स्टेटचे आतंकवादी वर्ष २००९ पासून देहलीमध्ये आत्मघातकी आक्रमणे आणि बॉम्बस्फोट करण्याचे नियोजन करत होते, अशी स्वीकृती या कटातील मुख्य सूत्रधार मुफ्ती सुहैल याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) चौकशीत दिली.

१. सुहैल २९ वर्षांचा असून तो धर्मांधांच्या संपर्कात आला होता. ‘भारतातील मुसलमानांवर अन्याय होत आहे’, अशी त्याच्या मनात भावना होती. (पाकिस्तान आणि बांगलादेश (पूर्वीचे पूर्व पाकिस्तान) येथे वर्ष १९४७ पासून हिंदूंवर अन्याय होत आहे. तेथे हिंदूंचा वंशसंहार केला जात आहे, असे मुसलमानांच्या संदर्भात भारतात कुठे घडले आहे किंवा घडत आहे का ? पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंनी कधी सूड घेण्यासाठी तेथे आतंकवादी कारवाया केल्या आहेत का ? – संपादक) बाबरी मशीद पाडल्याने मुसलमानांवर अन्याय झाला. (राममंदिर, काशी विश्‍वनाथ, कृष्णमंदिर यांसह सहस्रो मंदिरे मुसलमान आक्रमकांनी पाडली. हा हिंदूंवर अन्याय नाही का ? – संपादक)

त्याच्याशी भेदभाव केला जातो आणि यामुळे मुसलमान तरुणांना नोकरी मिळत नाही, असे त्याला वाटायचे. यामुळेच तो आतंकवादी  संघटनेत सहभागी झाला.

२. प्रारंभी तो अल्-कायदा आणि तालिबान या आतंकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक होता; पण त्या संघटनांशी त्याला संपर्क साधता आला नाही.

३. सुहैल ‘ऑनलाइन’च आतंकवादी संघटनेच्या संपर्कात आला. यानंतर त्याने इस्लामिक स्टेटचे समर्थन करणारी ‘हरकत-उल-हर्ब-ए-इस्लाम’ ही संघटना स्थापन केली, अशी माहितीही चौकशीतून समोर आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF