(म्हणे) गोशाळेमुळे उपद्रव होतो आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात !

स्वतः शंखवाळी येथे पुरातत्व खात्याच्या जागेत अनधिकृतपणे चर्च उभारली असतांना फादर लुईस आल्वारिस यांची आरोग्यमंत्र्यांकडे ७० वर्षांपासून येथे असलेल्या स्थानिक गोशाळेच्या विरोधात मात्र तक्रार !

ही आहे ख्रिस्त्यांची सहिष्णुता ! अल्पसंख्यांक जेथे बहुसंख्येने असतात, तेथे ते हिंदूंना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात किंवा असा त्रास देतात की, त्यांनी तेथून जागा सोडून जावे. पोर्तुगिजांनी आधी इन्क्विझिशनच्या नावाखाली गोव्यातील हिंदूंच्या संदर्भात हे क्रूर कृत्य केले, त्यामुळे त्यांना देवतांच्या मूर्तींसह देवळे सोडून पलायन करावे लागले. त्यांचीच क्रूर परंपरा आता स्वतंत्र गोव्यातील चर्चचे फादर चालवत आहेत. मुख्यमंत्री याची नोंद घेणार का ?

वास्को, १ जानेवारी (वार्ता.) – शंखवाळी (सांकवाळ) येथे पुरातत्व खात्याच्या जागेत (पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) अनधिकृतपणे उभारलेल्या अवर लेडी ऑफ हेल्थ चॅपलचे फादर लुईस आल्वारिस यांनी जवळच्या गोशाळेमुळे उपद्रव होतो आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात, अशी तक्रार आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याकडे केली आहे. सेंट जोसेफ वाझ यांचे फेस्त याच चर्चमध्ये होत असल्याचे फादर आल्वारिस यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची नोंद घेत कुठ्ठाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी गोशाळेच्या मालक मीलन नाईक आदींना फादर आल्वारिस यांच्या तक्रारीला अनुसरून लेखी प्रत्युत्तर देण्यास सांगितले.

गोशाळेच्या मीलन नाईक यांनी या तक्रारीला प्रत्युत्तरादाखल म्हटले आहे की, पुरातत्व खात्याच्या जागेत बांधण्यात आलेले चॅपल ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ हे चर्चच अनधिकृत आहे आणि यामुळे फादर आल्वारिस यांना गोशाळेच्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार रहात नाही. चर्चचे फादर आल्वारिस हे या ठिकाणी सेंट जोसेफ वाझ यांचे फेस्त वार्षिक होत असल्याची खोटी माहिती सांगून आरोग्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहे. वास्तविक सेंट जोसेफ वाझ यांचे फेस्त शिंडोळी येथे अवर लेडी ऑफ हेल्थया जागेत गेली ४०० वर्षे होत आहे आणि केवळ वर्ष २०१८ पासून हे फेस्त अनधिकृतपणे चॅपल ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ या पुरातत्व खात्याच्या जागेत भरवले जात आहे. खोटी तक्रार करणारे फादर आल्वारिस यांना गोशाळेच्या ठिकाणी प्रवेश करण्यास देऊ नये.

फादर लुईस आल्वारिस यांनी गत मासाच्या प्रारंभी गोशाळेच्या विरोधात आरोग्यमंत्र्याकडे लेखी तक्रार केली होती. प्रत्युत्तरात गोशाळेच्या मीलन नाईक यांनी पुढे म्हटले आहे की, ही गोशाळा वर्ष १९५० पासून येथे अस्तित्वात आहे आणि ती अधिकृत आहे. गोसेवा म्हणून मोकाट फिरणार्‍या गुरांना या ठिकाणी संरक्षण देऊन त्यांचे येथे संगोपन केले जाते. गोशाळेत नियमितपणे स्वच्छता पाळली जात असल्याने येथे डांसांची पैदास होणे आदी समस्या उद्भवत नाहीत. गोशाळेला अनुसरून यापूर्वी स्थानिक नागरिकांनी कधीही तक्रार केलेली नाही. वास्तविक फादर आल्वारिस यांनी पुरातत्व जागेत सभा, बैठका आदी घेण्यास बंदी असतांनाही चॅपल ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ येथे प्रार्थना सभा घेणे अनधिकृत आहे. फादर आल्वारिस यांनी अनेक वेळा गुंडांच्या साहाय्याने आमच्या भूमीत अनधिकृतरित्या प्रवेश करून चोरी केलेली असल्याने त्यांच्या विरोधात वेर्णा पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.


Multi Language |Offline reading | PDF