जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष २०१८ मध्ये ३११ आतंकवादी ठार

एक एक आतंकवाद्याला ठार करत गेलोे, तर काश्मीरमधून आतंकवाद नष्ट होणार नाही, त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता आणि पोषणकर्ता पाकला नष्ट करायला हवे, हे भारतीय शासनकर्त्यांना करता येत नाही, हे भारतियांचे आणि सैनिकांचे दुर्दैव ! आतंकवादाची समस्या न सुटणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

नवी देहली – जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष २०१८ मध्ये सुरक्षादलांनी ३११ जिहादी आतंकवाद्यांना ठार केले, अशी माहिती सैन्याकडून प्राप्त झाली आहे. गेल्या एका दशकातील ही सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने आतंकवादी एका वर्षात ठार झाले नव्हते. वर्ष २०१० मध्ये २३२ आतंकवादी ठार झाले होते.

गेल्या वर्षी आतंकवादाच्या ३४२ घटना घडल्या होत्या, यावर्षी यात वाढ होऊन त्या ४२९ झाल्या. यावर्षी आतंकवाद्यांच्या आक्रमणात ७७ नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ही संख्या ४० होती. तसेच आतंकवाद्यांच्या आक्रमणात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८० सैनिक हुतात्मा झाले. गेल्या वर्षभरामध्ये ही संख्या ८० होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now