पाकिस्तानी कारागृहांमध्ये ५३७ भारतीय बंदिवान

  • ‘या बंदिवानांची सुटका करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार काय प्रयत्न करत आहे’, हे त्याने सांगायला हवे !
  • ‘इस्लामी राष्ट्रात अडचणीत असलेल्या भारतीय मुसलमानांना साहाय्य करण्यासाठी तत्पर असणार्‍या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज याविषयी काय करत आहेत’, ते त्यांनी सांगायला हवे !

इस्लामाबाद – पाकिस्तानने द्विपक्षीय करारानुसार त्याच्या परमाणू प्रकल्पांची माहिती भारताला दिली. वर्ष १९८८ मध्ये हा करार करण्यात आला आहे. तसेच पाकच्या कारागृहांमध्ये ५३७ भारतीय बंदिवान असल्याचीही माहिती या वेळी देण्यात आली. यांत ४८३ मासेमार आणि ५४ अन्य लोक आहेत. या करारानुसार वर्षातून २ वेळा दोन्ही देशांनी त्यांच्या कारागृहात अटकेत असलेल्या संबंधित देशाच्या नागरिकांची माहिती एकमेकांना देण्याचा नियम आहे.


Multi Language |Offline reading | PDF