(म्हणे) ‘माझी जात आणि माझा समाज यांसाठी कार्य करणे, हे माझे प्रथम कर्तव्य !’ – राजस्थानच्या काँग्रेसच्या महिला आणि बालविकास राज्यमंत्री ममता भूपेश

जातपात नष्ट करण्याचे ढोंग करणार्‍या काँग्रेसचे हेच खरे स्वरूप आहे. त्यामुळे देश स्वातंत्र होऊन ७१ वर्षे उलटली, तरी जातपात नष्ट होऊ शकलेली नाही. जातीव्यवस्था नष्ट करण्यास सर्वपक्षीय शासनकर्त्यांना अपयश आल्याने आता हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

जयपूर – आमचे प्रथम कर्तव्य हे आमच्या जातीसाठी, त्यानंतर आमच्या समाजासाठी; मग सर्व समाजासाठी असेल. सर्वांसाठी आम्ही काम करावे, अशी आमची इच्छा आहे. त्याचसमवेत जिथे माझी आवश्यकता भासेल तिथे मी उपस्थित असेन, असे विधान राजस्थानच्या महिला आणि बालविकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ममता भूपेश यांनी  केले आहे. राज्यातील अलवर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या विधानाला विरोध होऊ लागल्यावर त्यांनी खुलासाही केला. ‘प्रत्येक व्यक्ती राज्यात सन्मानाने रहावी आणि सर्वांसाठी तिने काम करावे, असे मला वाटते’, असे त्या म्हणाल्या. (असे नंतर खुलासे केले, तरी ते एक ढोंगच आहे, हेच स्पष्ट होते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF