पर्यटनासाठी आलेल्या चिनी तरुणीवर खजुराहो येथे सामूहिक बलात्कार

  • अशा घटनांमुळे जगात भारताची ‘बलात्कार्‍यांचा देश’ अशी प्रतिमा झाली आहे !
  • आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी समाजाला साधना न शिकवल्याने समाजाची नैतिकता ढासळली आहे, तसेच बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा मिळत नसल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे ! ही दुःस्थिती शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद होय !

खजुराहो (मध्यप्रदेश) – भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका २५ वर्षीय चिनी तरुणीवर मध्यप्रदेशमधील खजुराहो येथे सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या तरुणीने याविषयी आगरा येथे तक्रार प्रविष्ट केली. ‘खजुराहो येथील काही स्थानिक तरुणांनी मला चहा दिला. त्यात अमली पदार्थ असल्याने मला गुंगी आली. नंतर निर्जनस्थळी नेऊन माझ्यावर बलात्कार केला’, असे या पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. ही तरुणी चीनमधील गुइझाऊ येथील रहिवासी आहे.


Multi Language |Offline reading | PDF