इस्लामाबादमध्ये भारतीय राजनैतिक अधिकार्‍याच्या घराचा वीजपुरवठा खंडित

  • पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांचा छळ चालूच !
  • पाकमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय अधिकार्‍यांचा पाककडून छळ होत असल्यामुळे त्यावर कठोर कृती करण्याची आवश्यकता असतांना भाजप सरकार निष्क्रीय होऊन पहात आहे, हे लज्जास्पद !
  • ‘नाक दाबले की तोंड उघडते’ या न्यायाप्रमाणे भारतातील पाक अधिकार्‍यांचा भारतानेही असाच छळ का करू नये ?

नवी देहली – पाकिस्तान सरकारकडून तेथील भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांचा छळ चालूच आहे. एका भारतीय राजनैतिक अधिकार्‍याच्या इस्लामाबाद येथील घरातील वीजपुरवठा ४ घंटे खंडित करण्यात आला होता. हा प्रकार त्या अधिकार्‍याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारा असल्याने भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे हा प्रश्‍न तातडीने उपस्थित केला.

भारताने म्हटले की, भारतीय दुय्यम सचिवाच्या बंगल्यातील वीजयंत्रणेत कुठलाही बिघाड नव्हता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार जाणूनबुजून करण्यात आला. संध्याकाळी ७ ते रात्री १०.४५ वाजेपर्यंत त्या सचिवाच्या कुटुंबाला विजेअभावी अंधारात बसावे लागले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now