अवैध मद्यविक्री उजेडात आणण्यासाठी गेलेल्या महिलांवर मद्य विक्रेत्यांचे जीवघेणे आक्रमण

  • मुजोर मद्य विक्रेत्यांच्या या कृत्याला शासनच उत्तरदायी आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ? अशा मुजोर मद्य विक्रेत्यांना कोण धडा शिकवणार ?
  • मद्य विक्रेत्यांच्या हल्ल्यात कुणाचे प्राण गेले असते, तर त्याचे उत्तरदायित्व सरकारने स्वीकारले असते का ?

कराड, १ जानेवारी (वार्ता.) – शहापूर (कराड) येथील अवैध मद्य विक्रीविषयी गावातील महिलांनी संघटित होऊन मोहीम चालू केली आहे. याविषयी मुख्यमंत्री, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांना निवेदने देण्यात आली; मात्र यावर कोणतीही ठोस उपाययोजना होतांना दिसली नाही. यामुळे संतप्त झालेल्या १० ते १२ महिलांनी अवैध मद्य विक्री होणार्‍या हॉटेलकडे धाव घेतली. हॉटेल मालक आणि कर्मचारी यांना जाब विचारतांना वादावादी झाली. या वेळी हॉटेल मालक, कर्मचारी यांनी महिलांवर जीवघेणे आक्रमण केले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या वेळी महिलांनी खड्डयात लपवून ठेवलेल्या मद्याच्या बाटल्या पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या. या घटनेमुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि कार्यपद्धती यांवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मद्य विक्रेत्यांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव

या वेळी पोलिसांनी महिलांना सांगितले की, अवैध मद्यविक्री करणार्‍या मुजोर हॉटेल मालक आणि कर्मचारी यांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव सिद्ध करण्यात येईल. तसेच प्रस्तावावर तातडीने कारवाई करून हॉटेल मालक आणि कर्मचारी यांना हद्दपार करण्यात येईल. (हद्दपार करणे म्हणजे संबंधितांना एका जागेवर गुन्हा करण्यास बंदी करून अन्यत्र गुन्हा करण्यास मोकळीक देणे होय ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF