(म्हणे) ‘समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील !’- कोरेगाव भीमा येथील स्तंभाला भेट दिल्यानंतर भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत नक्षलसमर्थकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठांवर आरोप करत नक्षलसमर्थकांनी अन्वेषण भरकटवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र पोलिसांनी ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी शनिवारवाड्यावर झालेल्या ‘एल्गार परिषदे’च्या विखारी भाषणांमुळे ही दंगल घडल्याचे उघडकीस आणले. तरीही हिंदुत्वनिष्ठांवर कारवाई करण्याची मागणी करणे, हा निव्वळ हिंदुद्वेषच आहे !

पुणे – कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ या दिवशी दंगल घडवणार्‍यांवर सरकारकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही. समाजात तेढ कशी निर्माण होईल आणि दंगल कशी घडेल, हेच सरकार पहात आहे, असा आरोप भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील स्तंभाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. गेल्या वर्षी १ जानेवारी या दिवशी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचारात कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली होती, तसेच राहुल फटांगडे या युवकाचा मृत्यू झाला होता.

‘कोरेगाव भीमा येथील घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचा हात असून भिडे (पू. संभाजीराव भिडेगुरुजी) आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली. गेल्या वर्षीच्या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस-प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

(संदर्भ : एम्पीसी न्यूज संकेतस्थळ)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now