जुळेवाडी आणि कांचनपूर येथील ग्रामबैठकांमध्ये हिंदु राष्ट्र जागृतीसाठी कार्य करण्याचा निर्धार !

तासगाव, १ जानेवारी (वार्ता.) – तासगाव येथे १० फेब्रुवारी २०१९ या दिवशी होत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर जुळेवाडी आणि कांचनपूर येथे झालेल्या ग्राम बैठकांमध्ये धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या बैठकांमध्ये हिंदु राष्ट्र जागृतीसाठी कार्य करणार्‍या निर्धार करण्यात आला.

जुळेवाडी येथील श्रीलक्ष्मी मंदिर येथील ग्रामबैठकीसाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. रवींद्र खोत (यादव), श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. योगेश खोत, धर्मप्रेमी सर्वश्री राजेश फडतरे, राहुल खोत यांसह ५५ धर्मप्रेमी उपस्थित होते. कांचनपूर येथे विठ्ठल मंदिरात झालेल्या ग्रामबैठकीमध्ये सौ. विद्या जाखोटीया यांनी साधनेचे महत्त्व, आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी ६० धर्मप्रेमी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF