ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या गोळीबारात लहान मुलाचा मृत्यू

ख्रिस्ती नववर्ष मद्य पिऊन आणि गोळीबार करून साजरे केले जाते, याचा एकही पुरो(अधो)गामी आणि मानवतावादी विरोध करत नाहीत !

नवी देहली – येथील उस्मानपूर भागात ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत करतांना एकाने हवेत गोळीबार केला. या गोळीबारात एका १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी २ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. तसेच ‘वेेलकम’ या भागात अशाच एका गोळीबारत १ मुलगा घायाळ झाला आहे.

बंगालमध्ये ख्रिस्ती नववर्षानिमित्त सहलीला गेलेल्यांपैकी ५ जण दामोदर नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF