३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपी चालकांची तपासणी करण्याचा पोलिसांना आदेश

ख्रिस्ती नववर्षानिमित्त एकीकडे ३१ डिसेंबरला मद्यालये,पब चालू ठेवण्याचा आदेश दिला जातो,तर दुसरीकडे मद्यपी चालकांची तपासणी करण्याचे आदेशही पोलिसांना दिले जातात. पोलीस, सरकार आणि प्रशासनाला स्वत:चीच भूमिका स्पष्ट नाही, असेच यातून दिसून येते !

पणजी – ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांची तपासणी करण्याचा आदेश पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी ३१ डिसेंबरला राज्यभरातील पोलिसांना दिला.

राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी आणि वाहतूक खात्याचे संबंधित क्षेत्रातील प्रमुख यांना वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासह मद्यपी चालकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला.किती मद्यपी चालकांवर कारवाई केली, याची प्रत्येक ठाण्यानुसार माहिती १ जानेवारी या दिवशी दुपारी १२ पर्यंत देण्याविषयीही पोलिसांना सांगण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक चंदर यांनी दिली.


Multi Language |Offline reading | PDF