गुजरातमध्ये हनुमानाच्या मूर्तीला सांताक्लॉजसारखा पोषाख 

हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे दर्शवणारी घटना !

  • मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कधी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे का ?
  • भाजपने राज्यात सत्ता असतांना हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले असते, तर अशा घटना घडून धर्मद्रोही कृती झाली नसती !

कर्णावती – गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील हनुमान मंदिरात मूर्तीला सांताक्लॉजसारखे (येशू ख्रिस्त याच्या जन्माच्या पूर्वसंध्येला सांताक्लॉज नावाची व्यक्ती मुलांसाठी खेळणी अथवा तत्सम पदार्थ घेऊन येतो, असे पाश्‍चात्त्यांची धारणा आहे.) कपडे घातल्याने येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे. हनुमानाच्या मूर्तीला परिधान केलेले हे कपडे काढून दुसरे कपडे घालावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याविषयी मंदिराचे मुख्य पुजारी विवेक सागर म्हणाले, ‘‘हे कपडे अमेरिकेत रहाणारे भाविक धरमभाई यांनी पाठवले आहेत. सध्या धनुर्मास चालू आहे. परंपरेनुसार देवाला प्रतिदिन २ वेळा वेगवेगळे कपडे घातले जातात. मुळात या गोष्टीवर वाद होणे चुकीचे आहे. हे कपडे उबदार आणि मऊ आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये देवाला अर्पित करण्यात आले आहेत.’’ (असे पुजारी भाविकांना काय दिशा दर्शन करणार ? थंडीमध्ये देवाला भावानुसार उबदार कपडे घालण्याला काहीच अडचण नाही; मात्र ते कपडे सांताक्लॉजसारखे असण्याला विरोध आहे, हे पुजारी यांना कळत नसेल, तर अशांना पुजारी का बनवण्यात आले, हा प्रश्‍न निर्माण होतो ! हिंदूंनी हे कपडे काढण्यासमवेत अशा पुजार्‍यांनाही हटवून धर्मशिक्षण असणार्‍या पुजार्‍यांना नियुक्त करण्याची मागणी केली पाहिजे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now