ठाणे, मुंबईला पाठवण्यात येणारा शस्त्रसाठा कह्यात; दोन धर्मांध अटकेत

मुळावर घाव घातला तरच आतंकवादाला पायबंद बसेल, हे सरकारच्या का लक्षात येत नाही ?

ठाणे, ३१ डिसेंबर (वार्ता.) – ठाणे आणि मुंबई येथे पाठवण्यात येणार्‍या मोठ्या शस्त्रसाठ्यासह दोन धर्मांधांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. शोएब इसाक शेख आणि रहीम शेख हे अमरावती येथील शीतल हॉटेलमध्ये शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे १० पिस्तूल आणि ४० जिवंत काडतुसे सापडली आहेत. शस्त्रांसहित पोलिसांनी आरोपींकडून तीन लाख रुपयांची रोकड आणि १० भ्रमणध्वनी संच कह्यात घेतले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF