रामराज्य आल्यास देश आणि विश्‍व सुखी होईल ! – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

सध्याच्या लोकशाही मार्गाने देशात कधीही रामराज्य येऊ शकणार नाही ! रामराज्य येण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करून धर्माचरण करणार्‍यांना सत्तेवर बसवले पाहिजे !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

उडुपी (कर्नाटक) – देशात उत्तम शासन आणि प्रजेचे योगक्षेम यांसाठी रामराज्य स्थापन झाले, तर देश अन् विश्‍व सुखी होऊ शकेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे केले. ते पेजावर श्रीकृष्ण मठाला भेट दिल्यानंतर बोलत होते. ‘मी भगवंताचा भक्त आहे. माझीही श्रद्धा आहे; परंतु राष्ट्रपतीपदावर बसल्यावर मला काही निर्बंधांसह कार्य करावे लागते’, असे ते म्हणाले. (भगवंतावर श्रद्धा ठेवून कार्य करतांना येणारे असे निर्बंध हटवण्यासाठी राष्ट्रपती प्रयत्न का करत नाहीत ? – संपादक)

राममंदिराविषयी केवळ स्मितहास्य !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आसनातून उठून परत जात असतांना पेजावर श्रीविश्‍वेशतीर्थ श्रीपाद यांनी अयोध्येत राममंदिर बांधण्याचा विषय काढल्यावर राष्ट्रपती कोविंद यांनी केवळ स्मितहास्य करून हात जोडून पुढे पाऊल टाकले. (श्रीरामांच्या मंदिराविषयीही बोलू न शकणारे राष्ट्रपती रामराज्याच्या बाता मारतात, हे हास्यास्पदच होय ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF