हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मोहीम !

हिंदूंनो, नववर्ष १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्याला साजरे करा !

चंद्रपूर येथे उपजिल्हाधिकारी श्री. भूगिलवार यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
सिंदी (रेल्वे) येथील नगराध्यक्षा सौ. संगीता शेंडे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

वर्धा, ३१ डिसेंबर (वार्ता.) – देशभरात नववर्ष गुढीपाडव्याला साजरे न करता ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. यानिमित्ताने अपप्रकारांतही वाढ झाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नववर्षाचा शुभारंभ मंगलदायी व्हावा, यासाठी धर्मशास्त्र समजून घेऊन भारतीय संस्कृतीनुसार ‘चैत्र शुद्ध प्रतिपदे’ला म्हणजे गुढीपाडव्याला ब्राह्ममुहूर्तावर नवीन वर्ष साजरे करणे आवश्यक आहे. याकरता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत प्रशासनाला निवेदन देण्यात आले, तसेच २ शाळांमध्ये प्रबोधन करण्यात आले. वर्धा येथे जिल्हाधिकारी श्री. शैलेश नावल, हिंगणघाट येथील तहसीलदार श्री. यादव, चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी श्री. भूगिलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशील नायर, सिंदी (रेल्वे) येथील नगराध्यक्षा सौ. संगीता शेंडे यांना निवेदन देण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF