(म्हणे) ‘देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे मुसलमान बांधव अस्वस्थ !’ – डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

पुणे – देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे मुसलमान बांधव अस्वस्थ आहेत. सातत्याने त्यांच्याविषयी संशयास्पद भूमिका असणे आपल्या देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने योग्य नाही. इस्लाम हा भारताचा अविभाज्य भाग आहे. सर्वसामान्य मुसलमान शांततावादी आहेत, दहशतवादी नव्हेत, असे विधान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. (या विधानावरून देशातील बहुसंख्य हिंदू असहिष्णू झाले आहेत, असे देशमुख यांचे म्हणणे आहे का ? इस्लाम हा भारताचा अविभाज्य भाग होता, तर देशाची विभागणी करून वेगळे इस्लामी राष्ट्र देण्यात कोणते शहाणपण होते, हेही देशमुख यांनी स्पष्ट करावे ! – संपादक) ‘गांधी आणि सहिष्णुता’ या विषयावर ते बोलत होते. त्या वेळी त्यांनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यावरही टीका केली.

‘एखाद्या नटाच्या पत्नीला राष्ट्र सुरक्षित वाटत नाही, तर एखाद्या नटाला आपल्या मुलांसाठी देश सुरक्षित नसल्याचे वाटते. या मंडळींना सुरक्षित वाटत नसेल, तर त्यांनी देश सोडून जावे,’ असे शंकर अभ्यंकर यांनी म्हटले होते. त्यावर देशमुख यांनी ‘अभ्यंकर तुमच्या विचारांतच असहिष्णुता आहे’, अशी टीका केली. (अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग हिंदूंनी केला की त्यावर टीका होते. यावरून हिंदूंच्या विरोधातच किती असहिष्णुता आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! – संपादक) देशमुख म्हणाले, ‘‘गाय ही बैलाची माता आहे, आपली नव्हे’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाक्याकडे आपण सोयीस्कर दुर्लक्ष करतो.’’ (असे असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेली हिंदु राष्ट्राची संकल्पना देशमुख यांना मान्य आहे का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF