रानमळा (धुळे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

धुळे, ३१ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील रानमळा गावात २७ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला रानमळा गावातील १५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील आणि श्री. पंकज बागुल यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता, त्यात येणार्‍या समस्या अन् उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले.

रानमळा गावातील बाळू तात्या गावडे, बाळू महाराज यांनी या सभेचे आयोजन केले होते. या आयोजनात गावातील अनेक युवकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन धर्मप्रसाराची सेवा केली.

क्षणचित्र : कडाक्याची थंडी असतांनाही सर्व जण सभा संपेपर्यंत उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF