मशिदींच्या ध्वनीक्षेपकांवरून नियमांचे उल्लंघन करून दिल्या जाणार्‍या अजानच्या विरोधात कारवाई न करणारे पोलीस !

‘फोंडा, गोवा येथील ३ मशिदींमधून नमाजाच्या वेळी ध्वनीक्षेपकावरून दिल्या जाणार्‍या अजानमुळे ध्वनीप्रदूषण होत असून आजूबाजूच्या परिसरात रहाणार्‍या नागरिकांना त्रास होतो’, अशी तक्रार नुकतीच फोंडा येथील रहिवासी श्री. दत्तात्रय कोलवेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली. ‘अतिशय मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपकावरून दिलेल्या या अजानच्या आवाजाने विशेष करून पहाटे ५ वाजता आजूबाजूच्या परिसरात रहाणार्‍या लोकांच्या झोपेत व्यत्यय येऊन त्यांची झोपमोड होते. लहान मुले, वृद्ध आणि आजारी माणसे यांना प्रतिदिन हा त्रास सहन करावा लागत आहे’, असे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.’


Multi Language |Offline reading | PDF