योगमुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्‍व जोडण्याचे काम होत आहे ! – राष्ट्रपती

धर्माची ढाल पुढे करून योग विद्येच्या नावे नाक मुरडणार्‍या संकुचित मनोवृत्तीच्या लोकांना सणसणीत चपराक !

मुंबई – योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून त्यामुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्‍व जोडण्याचे काम होत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. ‘योग प्रशिक्षण संस्थे’चा शताब्दी महोत्सव वांद्रे-कुर्ला संकुलातील एम्एम्आर्डीए मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘मुंबई ही देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी असून मनुष्यजीवनाशी संबंधित सर्व अभ्यासासह योगाचाही अभ्यास येथे होतो. शताब्दी पूर्ण करणार्‍या ‘योग प्रशिक्षण संस्थे’ने समाजाचा संतुलित विकास आणि आरोग्य यांसाठी भविष्यातही असेच योगदान द्यावे. योग शरीर, मन आणि आत्मा यांना जोडण्याचे काम करत असून तो आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वीकारला गेला आहे.’’

‘गेल्या १०० वर्षांत या संस्थेने योगविद्या घराघरात पोहोचवून लोकांना स्वस्थ ठेवण्याचे काम केले’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले, तर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘आजची जीवनशैली पहाता योग शिकणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’चा नारा दिला असून स्वस्थ भारत, हे उद्दिष्ट साध्य करतांना योग अंगीकारणे आवश्यक आहे’, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF