मुंबईत अनुमाने २१६ अवैध शाळा असल्याची शिक्षण समिती सदस्यांची माहिती

अवैध शाळा चालू होऊनही त्यांच्याविषयी सरकार आणि महापालिका प्रशासन गंभीर नसणे, हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याविषयी निष्काळजीपणा दर्शवते !

मुंबई – मुंबईत अनुमाने २१६ प्राथमिक शाळा अवैध असल्याची माहिती शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी उघड केली. त्यांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा फलक शाळेबाहेर लावण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले आहेत; मात्र त्यांच्यावर कारवाई करणे तर दूरच फलकही लावण्यात आले नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली. सरकारने अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असले, तरी त्यामुळे ४० सहस्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येईल, अशीही भीती सदस्यांनी व्यक्त केली. काही छोट्या छोट्या गोष्टींची या शाळांनी पूर्तता केलेली नाही; मात्र वर्ष २०१९ मध्ये जूनला शाळा चालू होण्यापूर्वी त्या शाळांना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरही नियमांची पूर्तता न करणार्‍या अवैध शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now