पंतप्रधान मोदी यांच्या ९२ परदेश दौर्‍यांवर २ सहस्र २१ कोटी रुपये खर्च

या दौर्‍यांतून भारताला काय मिळाले, किती देश भारताचे मित्र झाले आणि कठीण काळात साहाय्य करण्याचे मान्य केले, हेही सरकारने जनतेला सांगायला हवे !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत ९२ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण २ सहस्र २१ कोटी रुपये खर्च आला.  यामध्ये पंतप्रधानांच्या हॉटेल आणि अन्य लवाजमा यांच्या खर्चाचा समावेश नाही. पंतप्रधान मोदी यांनी आणखी २ परदेश दौरे केले, तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वाधिक परदेश दौरे करणारेे दुसरे पंतप्रधान ठरतील.  इंदिरा गांधी यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ११३ देशांचे दौरे केले होते. तसेच डॉ. मनमोहन सिंह यांनी १० वर्षांत ९३ देशांचे दौरे केले होते. त्यातुलनेत मोदी यांनी अवघ्या ४ वर्षे ७ मासांमध्ये ९२ देशांना भेटी दिल्या. यात काही देशांना दोन पेक्षा अधिक वेळा भेटी दिल्या.


Multi Language |Offline reading | PDF