मुंबई येथील जे.जे. रुग्णालयामध्ये खासगी पॅथालॉजीच्या दलालांकडून रुग्णांची लूट

दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी रुग्णालय प्रशासन आणि महापालिका समन्वय करून ठोस उपाययोजना का काढत नाही ? समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांची पिळवणूक होत आहे, याचे भान प्रशासनाला कधी येणार ?

मुंबई – येथील जे.जे. रुग्णालयामध्ये बहुतांश वैद्यकीय चाचण्या निःशुल्क, तर काही चाचण्या अल्प दरांमध्ये केल्या जातात; परंतु सध्या रुग्णालयामध्ये तपासणी किट नसल्याने खासगी पॅथालॉजीचे दलाल लुबाडत आहेत. रुग्णांना वैद्यकीय उपचार चालू करण्यासाठी निदान चाचणी अहवाल त्वरित हवे असतात. त्यामुळे ते फारसा विचार न करता या चाचण्या त्वरित करून घेण्यासाठी १०० रुपयांपासून ३ सहस्र ५०० रुपये रुग्णालयाच्या आवारातील खासगी पॅथालॉजिस्टच्या मध्यस्थांना देतात.

‘रुग्णालयाने अहवाल त्वरित देण्याचा प्रयत्न केल्यास खासगी पॅथालॉजी सेंटरकडून होणारी पिळवणूक थांबेल’, अशी अपेक्षा येथील रुग्णांनी व्यक्त केली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी म्हटले आहे की, रुग्णालयाने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली असून काही जणांना कह्यातही घेण्यात आले आहे. रुग्णांच्या कुटुंबियांनीही आधुनिक वैद्यांना निदान चाचण्या वैद्यकीयदृष्ट्या योग्यरितीने करण्यासाठी पडताळणीसाठी लागणारा अवधी द्यायला हवा.


Multi Language |Offline reading | PDF