शहापूर (जिल्हा ठाणे) येथे महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या अनुदानित गोशाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला !

शहापूर (जिल्हा ठाणे) – येथील अघई गावातील ‘जंगली महाराज आश्रम ट्रस्ट’च्या गोशाळेला ५० लक्ष रुपये अनुदान देण्याचा सोहळा पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते २९ डिसेंबरला पार पडला. ५० लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झालेली ही महाराष्ट्रातील पहिली गोशाळा असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. या वेळी जानकर म्हणाले की, राज्यातील पहिल्या अद्ययावत गोशाळेचे उद्घाटन माझ्याकडून झाल्याने मला पुष्कळ आनंद झाला आहे. यापुढे या गोशाळेच्या माध्यमातून विविध उत्पादने निर्माण केल्यास राज्य सरकार ती विकत घेईल. (गोशाळेला अनुदान देण्यासह राज्यात वाढत्या गोवंशहत्या रोखण्यासाठीही सरकारने प्रयत्न करायला हवेत. अन्यथा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गोसंवर्धनासाठी काहीतरी करत असल्याचा सरकार आव आणत आहे, असेच हिंदूंना वाटेल ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF