(म्हणे) ‘कोरेगाव भीमा दंगल, सनातन संस्था याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदा घ्याव्यात !’ – अशोक चव्हाण यांची प्रतिक्रियात्मक टीका

स्वतःचे घोटाळे बाहेर यायला लागले की, त्यावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांवर चिखलफेक करणे, ही काँग्रेसची जुनी खोड आहे !

मुंबई – राज्यात १७ सहस्रांपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. कोरेगाव भीमा दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉम्बनिर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही; पण आज ऑगस्टा वेस्टलॅण्डविषयी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेत्यांवर  आरोप केले. ते सहन न झाल्याने त्यांनी राज्यातील प्रश्‍नांवर आणि राफेल विमान खरेदी घोटाळ्यावरही पत्रकार परिषदा घ्याव्यात, अशी प्रतिक्रियात्मक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF